: मध्यप्रदेश येथे 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या 5 व्या खेलो इंडिया अंतर्गत राज्यस्तर कबड्डी निवड चाचणीचे उद्घाटन अर्जून पुरस्कार्थी शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मध्यप्रदेश येथे दि. 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया गेम्स-2022 मधील कबड्डी खेळाकरिता महाराष्ट्र राज्याचा संघ निवडीकरिता जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने निवड चाचणीचे आयोजन 1 ते 3 जानेवारी 2023 कालाधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आले आहे.