सातारा दि . 22 (फलटण टुडे ) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी माहे जानेवारी 2023 मध्ये खाली नमुद केलेल्या दिनांकास दौरा आयोजित केला आहे.
फलटण दि. 5,12,19 व 30 जानेवारी 2023. वाई 4 व 18 जानेवारी, वडूज 6 व 20 जानेवारी, दहिवडी 13 व 27 जानेवारी, महाबळेश्वर 9 जानेवारी, खंडाळा 11 व 25 जानेवारी, लोणंद 23 जानेवारी, व कोरेगाव 16 जानेवारी 2023 रोजी.
तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशान्वये वरील दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.