सातारा दि. 28 (फलटण टुडे ) :
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी पोर्टलवरुन नविन (Fresh) व नुतनिकरण (Renewal) च्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरु आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्ती योजनेच्या अर्जांवर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करुन अर्ज विहीत कालावधीमध्ये निकाली काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या आढावा बैठकीमध्ये दिल्या.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या
समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरण्यास योग्य ती मदत करुन समान संधी केंद्र समिती मार्फत
विद्यार्थ्यांना विहित कालावधीमध्ये अर्ज भरण्याबाबत कार्यवाही करुन घ्यावी व अर्जांची पडताळणी करुन पात्र
विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे शिष्यवृत्तीची अदागायी होणेकामी सादर करावेत असे अवाहनही यावेळी श्री. जयवंशी यांनी केले.