गोखळी (प्रतिनिधी):
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा गोखळी आणि गोखळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने आणि युवक मित्र, गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेतून युवकांना व्यसनमुक्ती संकल्प शपथ देऊन “दारू नको -दूध पिऊन ” सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप देण्याचा गोखळी व्यसनमुक्त संघाने नारा दिला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुमनताई हरिभाऊ गावडे होत्या. यावेळी हनुमान विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष बजरंग गावडे सवई, गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे कोरेगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी संजय कुमार बाचल, पोलीस पाटील विकास शिंदे, उपसरपंच सागर गावडे, श्रीराम ग्रामीण पतसंस्थेचे संचालक रमेशदादा गावडे सवई, डॉ.श्री.विकास खटके, गोखळी मठाचे मठाधिपती ओंकार गिरी इच्छा गिरी नागे महाराज, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, हनुमान विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ अभंग सर, गोखळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, राजीव दीक्षित गुरुकुल पिंप्रद च्या माई सुषमा दशरथे, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक चव्हाण, गोखळी विकास सोसायटीचे सचिव मारूती महाराज घाडगे, व्यसनमुक्त युवक संघाचे उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र फडतरे नाना उपस्थित होते. प्रारंभी अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि हनुमान माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज गोखळी येथील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गात ने व्यसनमुक्ती जनजागृती प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीमध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा आणि हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक पालक, युवक , युवती, महिला आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.प्रभात फेरीची सांगता हनुमान माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर झाली. यावेळी राजीव दीक्षित गुरुकुल पिंप्रद च्या विद्यार्थ्यांनी आणि पाटण येथील प्रशिक्षक सुर्यकांत पवार सर यांनी ‘ शिवकालीन मर्दानी खेळाचे आणि युद्ध कलेचे’ चित्तथरारक अंगावर रोमांच उभे राहणारे प्रात्यक्षिक करून दाखविले यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा आदी खेळांचा समावेश होता.तसेच इंदापूर जिल्हा पुणे येथील तानाजी पांडुळे यांचे “”व्यसनमुक्ती काळाची गरज “” या विषयावर व्याख्यान झाले. तसेच प्रा.विशाल गावडे यांचे “व्यसनाच्या विळख्यात आजची तरुणाई ” या विषयावर व्याख्यान झाले”. 31 डिसेंबर हा व्यसनमुक्ती दिन म्हणून सादर करण्याचा संकल्प व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. याप्रसंगी युवकांना कुस्तीचे व्यायामाचे प्रशिक्षण देऊन, युवकांसाठी कुस्ती, व्यसनमुक्ती चे कार्य सातत्याने चालू आहे असे वस्ताद पै. अनिल गावडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी श्री. केतन विलास गावडे व प्राचार्य अभंग सर यांनी सर्वांचे आभार मानले. यापूर्वी व्यसन करीत असलेले परंतु आज व्यसनमुक्त झालेत अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये श्री.बंडू जाधव, .बाळासाहेब चव्हाण, दिलीप पवार यांचा समावेश होता. व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गावडे मामा यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेणार्यांसाठी संपुर्ण पोशाख जाहीर केले. कार्यक्रमास उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते सामुदायिक व्यसनमुक्ती संकल्प शपथ घेतली.३१ रोजी इंग्रजी सरत्या वर्षाला सायंकाळी ४ वाजता दारू नको दूध प्या या उपक्रमांतर्गत मसाला दुधाचे वाटप करुन निरोप देण्यात आला. परिसरातील शेतकरी बांधवांनी दुुध संकलन करुन उपलब्ध करुन दिले, त्याबद्दल रमेश दादा गावडे सवई यांनी शेतकरी बांधवांचे आभार मानले. सदर सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा गोखळी तसेच व्यसनमुक्ती महिला आघाडी व समस्त गोखळी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.व यानिमित्ताने सर्वांनी कायम व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला.