अनिल यादव याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनदन करताना महाराष्ट्र अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर , क्रीडा मार्गदर्शक उत्तम घोरपडे
फलटण ( फलटण टुडे ) :
मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यां तेजस अनिल यादव याने
कोल्हापूर विभागीय स्पर्धा स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या विभागीय वुशू स्पर्धेमध्ये या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली.या विद्यार्थ्याला मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक श्री उत्तम घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती तथ विद्यमान विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी महाराष्ट्र अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी अरविद निकम , प्रशालेचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.