बारामती (फलटण टुडे ):
बारामती पंचक्रोशीत प्रथमच हृदयविकार शस्त्रक्रियेतील क्लिष्ट अशी समजली जाणारी रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या करण्यात आली अशी माहिती बारामतीचे पहिले हृदयरोगतज्ञ डॉ.सनी शिंदे यांनी दिली.
याबाबतची हकीगत अशी की,रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता,रूग्णाच्या रक्तवाहिनीची परिस्थिती पाहता बायपास करणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा वेळ आणि रूग्णाचे वय लक्षात घेता, लवकर निर्णय घेणे व शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे यावेळी अत्याधुनिक अशा रोटाब्लेशन पद्धतीद्वारे अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेऊन डॉ.सनी शिंदे यांनी रुग्णाला तात्काळ डॉ. रमेश भोईटे यांच्या गिरीराज हॉस्पिटल येथे दाखल केले व यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली. बारामतीमध्ये रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ होती, डॉ.सनी शिंदे यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व मोठी जोखीम पत्करून या रुग्णाचे प्राण वाचवले. त्यामुळे नातवाईक व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ.सनी शिंदे हे बारामती येथील प्रसिद्ध व पहिले हृदयरोग तज्ञ आहेत.यापूर्वी देखील त्यांनी अवघड अशा अँजिओप्लास्टी करून बारामती व परिसरातील रुग्णांना आपली सेवा दिली आहे. डॉ.सनी शिंदे यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील गरजूंची यापुढे पुण्या-मुंबईला जाऊन उपचार घेण्याची गैरसोय दुर झाली आहे. रोटाब्लेशन तंत्रज्ञान देशामध्ये काही ठराविक शहरामध्येच उपलब्ध होते. पण आता डॉ.सनी शिंदे यांच्या माध्यमातून ही उपचारपद्धती व क्लिष्ट शस्त्रक्रिया बारामती येथे करणे सोयीचे व शक्य झाले आहे.या यशस्वी अँजिओप्लास्टीसाठी गिरीराज हॉस्पिटलचे डॉ.रमेश भोईटे,भूलतज्ञ डॉ.संतोष घालमे, तसेच सर्व कॅथ लॅब टेक्नीशियन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. डॉ.सनी शिंदे यांचे बारामती येथेच आशा हार्ट क्लिनिक, अशोकनगर येथे दवाखाना आहे.