क्रांतिसिंह नाना पाटील शाखेच्या मॅनेजर श्रीमती माया सोनवणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करताना मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर
क्रांतिसिंह नाना पाटील शाखेच्या सौ कदम मॅडम यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करताना मालोजीराजे शेती विद्यालयाचे उपप्राचार्या सौ कदम मॅडम
फलटण ( फलटण टुडे ) :
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्या असे आव्हान क्रांतिसिंह नाना पाटील शाखेच्या मॅनेजर श्रीमती माया सोनवणे यांनी फलटणएज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथील कार्यक्रमात अवाहन केले
यावेळी त्यांनी पगार तारण कर्ज असेल अथवा OD असेल ,तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मासिक पगार घेणाऱ्या नोकरदारांसाठी जिल्हा बँकेने घेतलेले आहेत याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे.
यानंतर सौ कदम मॅडम यांनी किसान पे ॲप बद्दल माहिती सांगितली यावरती ऑनलाईन ट्रांजेक्शन करणे.एका खात्यातून दुसऱ्या खात्यावरती पैसे पाठवणे सविस्तर माहिती सौ कदम यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर होते उपप्राचार्य सौ कदम मॅडम व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज कदम यांनी केले