जिजाऊ करिअर अकॅडमी ला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

जिजाऊ करिअर अकॅडमी मध्ये सुप्रिया सुळे व विद्यार्थी, विश्वस्त (छायाचित्र: सायली परकाळे)

बारामती ( फलटण टुडे ) :: 
बारामती तालुका मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ करिअर अकॅडमी च्या कार्यालयास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली ( मंगळवार २७ /१२/२०२२) व विविध उपक्रमाची माहिती घेतली.
या प्रसंगी अध्यक्ष नामदेवराव तुपे व विश्वस्त देवेंद्र शिर्के ऍड. विजय तावरे मनोज पोतेकर ,छाया कदम व प्रदीप शिंदे आणि जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे उपाध्यक्षा स्वाती ढवाण व पत्रकार व निवेदक अनिल सावळेपाटील आदी उपस्तीत होते .
मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या करिअर अकॅडमी च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा साठी विध्यार्थी सक्षम होतात ही आनंदाची आणि समाधानाची बाब असून मंगल कार्यालय, जिजाऊ शिष्यवृत्ती योजना व करिअर सेंटर च्या माध्यमातून सामाजिक कार्य होत असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी विश्वस्तांच्या कार्याचे कौतुक केले .
बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने यावेळी सुप्रिया सुळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!