बारामती ( फलरण टुडे ):
“कामगार बंधुंनो अंतर्मनाची ताकद वापरून यशस्वी व्हा” असा सल्ला माईंड ट्रेनर डॉ दत्ता कोहिनकर यांनी बारामती एमआयडीसी येथे मनाची मशागत कार्यशाळा मध्ये दिला.
कामगार कल्याण मंडळ आणि आयएसएमटी कामगार संघटना बारामती यांच्या वतीने मनाची मशागत कशी करावी याविषयी डॉक्टर दत्ता कोहिनकर यांची कार्यशाळा संपन्न झाली या वेळी कोहिनकर मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी आयएसएमटी चे प्लांट हेड किशोर भापकर,
कामगार कल्याण निरीक्षक संदीप गावडे ,अध्यक्ष कल्याण कदम ,सेक्रेटरी गुरुदेव सरोदे, उपाध्यक्ष शिवाजी खामगळ खजिनदार रवींद्र गिरमकर, सल्लागार रमेश लोखंडे, संतोष साळवे, सदस्य सुरेश दरेकर, संजय सस्ते ,सुनील पोंदकुले व कर्मचारी उपस्तीत होते.
मनाची मशागत याविषयी विविध उदाहरणे आणि प्रात्यक्षिक देत मनाची अमर्याद शक्ति कशी वाढवावी,रोज शंभर टाळ्या वाजवा हृदयरोग टाळा , यशातील सर्वात मोठा अडथळा हे आपल्या अंतर्मनातील भय असते त्यावर मात करून यशाचा मार्ग सुकर करता येतो , वास्तविकतेला जर बदलायचे असेल तर आपल्याला कल्पनाशील बनावे लागेल. क्रिएटिव्ह विज्वलायझेशन करून मनामध्ये हव्या असणाऱ्या गोष्टींचा चित्रपट तयार करून असाध्य गोष्टी साध्य करता येऊ शकतात असेही डॉ. दत्ता कोहिनकर यांनी सांगितले.
आशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगाराचे मनोबल वाढून कंपनी म्हणजेच कुटूंब ही प्रवृत्ती वाढत असल्याचे प्लांट हेड किशोर भापकर यांनी सांगितले.
आभार गुरुदेव सरोदे यांनी मांडले.
—————————————-