जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद : खा. सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांच्या समवेत जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी ( छायाचित्र : सायली परकाळे)

बारामती ( फलटण टुडे ): 
महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी व बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिलांसाठी केलेले जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती तालुका मराठा व जिजाऊ सेवा संघ व उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदघाटन प्रसंगी सुप्रिया सुळे महिलांना मार्गदर्शन करीत होत्या.
या प्रसंगी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा -हेमलता परकाळे, उपाध्यक्षा स्वाती ढवाण, कार्याध्यक्षा सुनंदा जगताप, उपकार्यध्यक्षा प्रतिभा बर्गे, सचिव ज्योती खलाटे, सहसचिव सारिका परकाळे, खजिनदार संगीता शिरोळे, सहखजिनदार अर्चना परकाळे व माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
व उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान अध्यक्ष जगन्नाथ जगताप,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे, विश्वस्त देवेंद्र शिर्के, मनोज पोतेकर ऍड विजय तावरे,सौ छाया कदम व कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे व विजया कदम, अनिता गायकवाड ,वनिता बनकर,कल्पना माने, ऋतुजा नलावडे, मनीषा खेडकर, रजनी सावंत आदी उपस्तीत होते.
महिलांचे संघटन करून त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कार्य करणे व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत तपासणी करून आरोग्यदूताची भूमिका जिजाऊ सेवा संघ पार पाडत असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये वर्षभरातील विविध कार्याची माहिती अध्यक्ष हेमलता परकाळे यांनी दिली.
आरोग्य तपासणी शिबीर मध्ये योगदान दिल्याबद्दल बुधराणी हॉस्पिटल पुणे व देशपांडे हॉस्पिटल बारामती यांचा सत्कार करण्यात आला व 300 नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार स्वाती ढवाण यांनी मानले.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!