श्रायबर डायनामिक्स वतीने रुईमध्ये विहिरीची स्वच्छता मोहीम

रुई मधील पूर्वीची कचरा युक्त विहीर 

रुई मधील पूर्वीची कचरा युक्त स्वछता केल्यावर दिसत असलेली विहीर

बारामती ( फलटण टुडे ): 
बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनामिक्स डेअरी च्या वतीने रुई मध्ये स्वछता मोहीम करण्यात आली.
या वेळी प्रा. अजिनाथ चौधर,शहर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष नवनाथ चौधर,व कंपनीचे हेमंत चव्हाण, मानसिंग मांडे आदी मान्यवर व अधिकारी उपस्तीत होते.
रुई गावातील महादेव मंदिर नजीक असलेल्या ५० फुटी विहिरींमध्ये अनेक वर्षांपासून कचरा टाकला जाईचा, त्याच प्रमाणे शेवाळे साचून पाण्याची दुर्गंधी येत होती परंतु सामाजिक कार्यकर्ते प्रा अजिनाथ चौधर यांच्या पाठपुराव्याने कंपनीने कंपनीने स्वछता मोहीम राबवली त्यामुळे विहीर स्वच्छ होऊन पाण्याच्या पातळी मध्ये वाढ झाली.
त्या विहिरीच्या पाण्यावर आकर्षक कारंजे बसविले जाईल व शेजारील जागेत बारामती नगर परिषद च्या वतीने स्वछता मोहीम चे दिवस व रात्री दिसतील असे एलईडी चे आकर्षक रंग संगती मध्ये बोर्ड लावले जाणार असल्याची माहिती बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

  

————————
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!