दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी शाहू स्टेडियम सातारा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली त्यामध्ये
14 वर्षाखालील मुले व मुली
अनुष्का कोठारी – Gold Medal
ध्रुवी मेहता – Silver Medal
अबीर घोष – Bronze Meda
17 वर्षाखालील मुले व मुली
अथर्व खरात – Gold Medal
श्रेय दोषी – Silver Medal
मिताली सस्ते – Silver Medal
या स्पर्धेत पूर्ण जिल्ह्य़ातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक साहेब यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचलन श्री. सुरज ढेंबरे यांनी केले आभार प्रदर्शन अनिल निकाळजे सर यांनी केले. या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून जय पवार यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत अनुष्का कोठारी व अथर्व खरात या दोघांची शालेय विभागीय KARATE स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कराटे खेळाचे मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक श्री. सुरज ढेंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, फ.ए.सो.फलटण क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री .शिवाजीराव घोरपडे ,
तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. मिनल दिक्षित यांनी अभिनंदन केले.👏💐