गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्य
प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगावणे , येवले सर , शिवाजीराव काळे ,नरुटे सर अभंग सर ,पी एन शिंदे इत्यादी मान्यवर
फलटण (फलटण टुडे ) :
भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या दिवसाची घोषणा केली.
श्रीनिवास रामानुजन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून आज गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे हा दिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला .
यावेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुधोजी हायस्कूल चे माजी प्राचार्य येवले सर होते . त्यांनी गणिताच्या अनेक गंमती जमती विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात व हसत खेळत सांगितल्या तसेच यावेळी त्यांनी रामानुजन यांच्या जीवनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितल्या यावेळी त्यांनी सांगितले की रामानुजन फार कमी वर्षे जगले म्हणजे ते फक्त 32 वर्षे जगले व त्यांची पत्नी जानकी ही 85 वर्ष जगली पण याच जानकीने रामानुजन यांनी जे काही सिद्धांत मांडले होते त्या कागदपत्रांची जपणूक करून ठेवलेली होती त्याचेच पुढेअमेरिकन शास्त्रज्ञाने एक पुस्तक तयार केले व ते जगासमोर आणले त्यामुळे जगाला रामानुजन या महान गणितीतज्ञाची ओळख झाली .गणितामध्ये तर्क करणे विचार करणे हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्याबरोबर गणित असते गणितामुळे आत्मविश्वास निर्माण होतो तसेच त्यांना शून्य कळला पाहिजे शून्य कसा जन्माला आला याचे उत्तम उदाहरण यावेळी त्यांंनी दिले. गणितामुळे अनेक प्रश्न सुटतात असे त्यांनी या वेेेळी सांगितले .
या कार्यक्रमास गुरु द्रोणा अँकॅडमी चे प्रमुख नरुटे सर , सकाळ विभागाचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , ज्येष्ठ शिक्षक पी एन शिंदे , आर एम पवार, शामराव आटपाडकर , नितीन जगताप, पी.अभंग व दत्तात्रय घार्गे अनिल सोनवलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तृप्ती शिंदे यांनी केले तर आभार नितीन जाताप यांनी मानले .