कुरवली खुर्द ग्रामपंचायतीवरती राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व

सरपंचपदी राहूल तोडकर यांचा मोठ्या फरकाने विजय

कुरवली खूर्द च्या सरपंचपदी  निवड झाल्याबद्दल
राहूल  तोडकर  व इतर सदस्यांचा सत्कार करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर


फलटण दि 23 ( फलटण टुडे ):

कुरवली खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीतराष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार राहूल बापूराव तोडकर यांनी 421 मते घेवून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 123 मतांनी दारुण पराभव केल.

जानुबाई वॉर्ड क्र. १ मधून सौ. आशा विष्णू घनवट यांना 223 मते तर सौ. विशाखा दिपक निंबाळकर यांनी१९७ मते घेवून विजयी झाल्या. वॉर्ड नं.3 हनुमान वॉर्ड यामधून दिपक चंद्रकांत निंबाळकर यांनी 165 मते घेतली तर सौ. शितल सुभाष अहिवळे यांनी176 मते घेवून विजयी झाले व कुरवली खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलची सत्ता ग्रामपंचायतीमध्ये खेचून आणली


या विजयासाठी बापूराव घनवट , बाळासाहेब निंबाळकर , आप्पासो नोडकर, किसन तोडकर, ज्ञानेश्वर पिसाळ, बाळासाहेब तोडकर , धनंजय अहिवळे, बजरंग नाळे , कांताराम नाळे व इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
विजयी सर्व उमेदवारांचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विधमान विधान परिषद सदस्य मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष तथा मा, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. दिपकराव चव्हाण यांनी अभिनंदन केले.

चौकट
फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द ग्रामपंचायतीची विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये निंबाळकर पती – पत्नी दिपक निंबाळकर व विशाख निंबाळकर
यांचा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्येविजय संपादन करून ग्रामपंचायत मध्ये या दांपत्याचा प्रवेश झाला .

चौकट

विजयी उमेदवार बहुतांश उच्चशिक्षित असल्याने ग्रामस्थांच्या विकासाबाबत मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना आशा आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!