ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश बारामती तालुका कार्यकारिणी जाहीर

बारामती ( फलटण टुडे ) :
 ग्राहक कल्याण जनजागृती सप्ताह निमित्त ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे जिल्हा विभागीय बैठक केडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे हे होते.
       या कार्यक्रमात बारामती,इंदापूर व दौंड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.बारामती तालुका अध्यक्षपदी सुशीलकुमार विलास अडागळे,उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन सदय्या हिरेमठ,सहसचिव पदी शंतनू सोपान साळवे तसेच कोषाध्यक्ष हनुमंत पिराजी खोमणे,कार्यवाहक श्रीमंत लक्ष्मण मांढरे,कार्याध्यक्ष प्रमोद वसंतराव शिंदे,संपर्कप्रमुख अजय मोतीराम पिसाळ व प्रसिद्धी प्रमुख माधव श्रीहरी झगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
       ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश हि राज्यस्तरीय संस्था आहे, ग्राहकांच्या न्यायिक हक्कांकरीता लढा देणे व वंचित ग्राहकांचे संरक्षण ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या मर्यादेत राहून करणे.याच बरोबर ग्राहकांच्या मूलभूत हक्कांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्याकरीता अखंडपणे निस्वार्थी भावनेने कार्य करणे हे संघटनेचे मूळ उद्दिष्टाचे मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश सदस्य अस्लम तांबोळी,पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे तसेच जिल्हा उपाध्यक्ष मारुती पठारे,अनिल नेवसे,कार्यवाहक सुभाष काळे,सचिव सतीश थिटे,सहसचिव संजय धुमाळ,कोषाध्यक्ष पोपटराव साठे,सदस्य सविता सोनवणे,सुभाष कामठे व प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सुनील बबन थोरात इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!