बारामती ( फलटण टुडे ) :
सिंधुदुर्ग जिल्हा समुद्र जलतरण स्पर्धेत बाल कल्याण केंद्र मतिमंद विभाग व वीर सावरकर स्वीमर्स क्लब ची जलतरणपटू
कु. वरदा कुलकर्णी हिची यशस्वी कामगिरी
दि . १७.१२ . २०२२ रोजी मालवण येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत बारामती जलतरण तलावाची जलतरणपटू कु वरधा संतोष कुलकर्णी हिने विशेष गटात(मतिमंद विद्यार्थी ) चौथा क्रमांक प्राप्त केला.
सदर जिल्हा स्तरीय स्पर्धे सिंधुदुर्ग जिल्हा संघटना यांच्या मार्फत दि.२०१८ डिसेंबर २०२२ रोजी मालवण येथे पार पडल्या. या स्पर्धेस सिंधुदुर्ग, मुंबई, भाग घेतला. ठाणे, नागपूर, नाशिक व वर्षा अशा विविध भागातून अनेक
कु. वरदा कुलकर्णी हिने विशेष गटातील १० ते १६ या वयोगटामध्ये सहभाग घेतला. या गटातील एक किलोमिटर एवढे अंतर पार करणा-या पहिल्या १० स्पर्धकांना गौरवण्यात आले. कु. वरदा हिने या गटात चौथा क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेची तयारी तिन बारामती जलतरण तलावात केली. वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे स्पर्धेकांना विशेष सहकार्य लाभले. वारामती जलतरण तलावाच्या सर्व कार्यकारी मंडळाकडून व शाळेचे मुख्याध्यापक वी. एन कांबळे व सर्व शिक्षकांकडून अभिनंदन केले.