सर्व श्रावक श्राविकांना कळविण्यात येते की शिखरजी हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी भारत बंद आहे त्यानिमित्त
संपूर्ण फलटण तालुक्याचा फलटण येथे आपण सर्वांनी बंद पाळुन मूक मोर्चा काढावयाचा आहे.
मूक मोर्चा सकाळी ठीक ९ वाजता श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर, मारवाड पेठ,फलटण पासून निघेल व तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात येईल तरी सर्व श्रावक-श्राविका, युवक-युवती नी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
मुक मोर्चा मार्ग -श्री १००८ चंद्रप्रभु जैन मंदीर-श्री१००८ आदिनाथ मंदीर-शंकर मार्केट-शिंपी गल्ली-छञपती शिवाजी महाराज चौक-भगवान महावीर किर्ती स्तंभ-महात्मा जोतिबा फुले चौक-तहसीलदार कार्यालय फलटण येथे येणार आहे व तेथे निवेदन देण्यात येणार आहे.