बारामती (फलटण टुडे ) :
देशाचे नेते माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त माणवासीय रहिवासी संघाच्या वतीने कन्हेरी वन उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडांची लागवड करण्यात आली.*
माणवासीय रहिवाशी संघ नेहमीच वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी प्रयत्नशील असतो. याप्रसंगी माणवासीय रहिवाशी संघांचे पदाधिकारी उमेश पांढरे पाटील, अप्पासाहेब भांडवले, शहाजी खाडे, अमोल कदम, गिरीष सूर्यवंशी, निवृत्ती पारसे, हणमंत खाडे व इतर बांधव उपस्थित होते