बारामती :
पाहुणेवाडी येथील कुंडलिक बाबुराव तुपे वय वर्ष 79 यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 09 डिसेम्बर रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती
रिअल डेअरी इंडस्ट्रीज बारामती व फॉर्च्यून डेअरी इंडस्ट्रीज इंदापूर चे चेअरमन मनोज तुपे यांचे वडील होत.
पाहुणेवाडी येथे रविवार दि. 10 /12/2022 रोजी सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.