बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
शुक्रवार, दि. 09 डिसेम्बर रोजी जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा मुले श्री.संभाजी विद्यालय,बोरी बु जुन्नर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कोऱ्हाळे येथील “श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज” चा विद्यार्थी
कु.अभिमन्यु संजय चौधर या विद्यार्थिने कुस्ती मध्ये 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची विभागीस्तरीय निवड झालेली आहे. सद्या इयत्ता 9 मध्ये तो शिक्षण घेत आहे.
त्याच्या या यशाबद्दल पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील, मनोज कुणकर, सौ सावंत, सुनील लोकरे आदी च्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
क्रीडा मार्गदर्शक शिक्षक वैभव जराड , नासिर बागवान यांनी अभिमन्यू चौधर यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
————————————-