गोखळी येथील नेत्र तपासणी शिबीर मार्गदर्शन करताना डॉक्टर अपर्णा काटे शेजारी डावीकडून रमेश गावडे, योगेश घाडगे, विकास शिंदे, सरपंच सुमनताई गावडे,चेतन मोहिते.
गोखळी प्रतिनिधी (फलटण टुडे वृत्तसेवा ) :- मोबाईलच्या वापराने मन, मेंदू आणि बुद्धीवर सुद्धा परिणाम होतो यासाठी लहान मुलांनी, विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मोबाईलचा वापर टाळाला पाहिजे असे आवाहन कृष्णदृष्टी रुग्णालय बारामती च्या नेत्र स्पेशलिस्ट डॉ अपर्णा काटे यांनी केले.
फलटण पूर्व भागातील गोखळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आय सी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स बारामती यांच्यावतीने इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉक्टर अपर्णा काटे बोलत होत्या. डॉ.अपर्णा काटे बोलताना पुढे म्हणाल्या की,कोविडच्या कालावधी मध्ये लहान मुलांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम दिसून आले, नजर गेली, नंबरचे चष्मे लागले डोळ्याचे नुकसान झाले, एवढं सांगूनही दोन वर्षातील सवयी कमी होत नाही मोबाईल डोळ्यावर मनावर आणि बुद्धीवर सुद्धा परिणाम करू शकतो हे मी डोळ्याचे डॉक्टर म्हणून अनुभवातून सांगते असे सांगून डॉ काटे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा शंभर टक्के वापर टाळला पाहिजे विद्यार्थ्यांनी सुट्टीचे वेळात खेळत असताना एकमेकांच्या डोळ्यांमध्ये माती टाकू नये व डोळ्यांमध्ये पेन्शिल,करकट, टोकदार वस्तू पासून इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. डोळ्यात माती पेन्सिल गेल्याने डोळे गेल्याचे सुध्दा पाहायले आहे,डोळा शरीरातील महत्त्वाचा नाजूक अवयव आहे थोडीशी जरी इजा झाली तरी परिणाम खूप मोठा होतो, टीव्ही लांबून पहा स्क्रीन पासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करून डॉ काटे म्हणाल्या शालेय लहान विद्यार्थ्यांच्या डोळ्या सारख्या महत्त्वाच्या अवयवाची मोफत तपासणी करण्याचा आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले .
यावेळी प्राथमिक शाळेतील व हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील २३१ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये दृष्टीदोष निघालेल्या ३१ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे व विद्यार्थ्यांना आयसीआयसीआय लोंबार्ड यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच सागर गावडे पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ अभंग, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भोसले, आय सी आय सी आय लोंबार्ड मॅनेजर विकास शिंदे, योगेश घाडगे, प्रफुल्ल वाबळे,अजय अक्षय,अनपट सर,शाम राख,भोळे सर, संतोष सोनवणे,भोळे मॅडम, मनिषा घाडगे, तसेच कृष्णदृष्टी हॉस्पिटल बारामती च्या डॉ अपर्णा काटे, व्यवस्थापकीय अधिकारी चेतन मोहिते, आशावरी शिंदे ,विठ्ठल साळवे ,सुनील गार्डी ,विजय यादव नागेश पिसाळ माजी सरपंच रमेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव,पोलीस पाटील विकास शिंदे.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक चव्हाण, शेखर लोंढे हनुमान विद्यालय व जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम जाधव व आभार प्रा. शिक्षिका सुनिता गावडे यांनी मांनले.