निंभोरे येथे महापरिनिर्वाण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करून महामानवाला अभिवादन

आसू (आनंद पवार ) :

भारतरत्न परमपूज्य विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या निंभोरे येथे असणाऱ्या स्तिकलशाला लाखो जन समाजाने अभिवादन केले.
फलटण तालुक्यातील व फलटण शहरातील विविध राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने या महामानवाला अभिवादन करण्यात आले होते प्रारंभी फलटण शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर आमदार दीपक राव चव्हाण राष्ट्रवादीचे हरीश काकडे तसेच विविध पक्षातील मान्यवरांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

तालुक्यातील आसू गोखळी गुणवरे बरड जावली ,दुदेबावी ,सासकल, गिरवी, कोळकी, साखरवाडी, सांगवी सरडे, रांजाळे,सांगवी तरडगाव आदी गावासह विविध वड्या, वस्त्या, वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर त्रीसरण पंचशील व बुद्ध पूजा घेण्यात आली.
आसू येथे कँडल मार्च काढून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ऍड.जीवन पवार, रवींद्र पवार यांच्यासह सिद्धार्थ तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी निंभोरे तालुका फलटण येथे असणाऱ्या विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थिकलशा ला सर्व भीम अनुयायांनी आभिवादन केले.फलटण येथील मंगळवार पेठ येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली निभोर येथे येणाऱ्या सर्व भीमसैनिक व नागरिकांचे निंभोरे गावचे सरपंच मुकुंद काका रनवरे ,फलटण चे हरीश काकडे, डॉ.बी. आर.कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कांबळे,नवनाथ कांबळे, व इतर सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित असणारे चे स्वागत केले. फलटण,बारामती ,इंदापूर, माळशिरस, खंडाळा,सह अनेक ठिकाणच्या भीमसैनिक उपासक उपासिका यांनी आभिवादन केले बारामती येथील प्रसिद्ध गायक गरूडा व सहकाऱ्यांचा भिमगितांचा कार्यक्रम झाला.उपस्थितांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला.

चौकट… 171 भिम अनुयायांनी रक्तदान करून महामानवाला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!