डोर्लेवाडीचा ईगल स्पोर्ट्स क्लब राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी

कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्याईगल स्पोर्ट्स क्लब संघास बक्षीस वितरण करताना मान्यवर.

डोर्लेवाडी , ता. ५ : राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदारशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित केलेल्या ६५ किलो वजनीगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील ईगल स्पोर्ट्स क्लब या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. पुणे, सोलापूर, सातारा,नगर जिल्ह्यातील ४२ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर कबड्डी संघ सातारा, तृतीय क्रमांक जय हनुमान स्पोर्ट्स क्लब डोर्लेवाडी व चतुर्थ क्रमांक सेव्हन स्टार क्रीडा मंडळ डोर्लेवाडी यांनी मिळविला.उत्कृष्ट चढाई आदित्य गोरे, उत्कृष्ट पकड किरण कालगावकर व सलमान शेख यांस सामन्याचा मानकरी म्हणून पुरस्कार मिळाला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात
आले.

ईगल स्पोर्ट्स अकॅडमी यांनी शनिवार व रविवार या स्पर्धांचे आयोजन केले होते. बारामती सहकारी
बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, अनिल तावरे, सरपंच पांडुरंग सलवदे, उपसरपंच संदीप नाळे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव कुंडलीक नाळे , रमेश मोरे, प्रा. अंकुश खोत, ज्ञानदेव नाळे, शहाजी दळवी, भगवान क्षीरसागर, राजेंद्र गावडे, काकासाहेब शिंदे, राजेंद्र बोरकर, पद्मनाभ निकम, ईगल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष सुनिल पागळे, उपाध्यक्ष अजित बनकर, सचिव गणेश खोत,गुलाबराव कालगावकर किसन शेलार रामभाऊ बनकर , योगेश नाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

निलेश भोंडवे, सचिन नाळे यांनी स्पर्धेचे सुत्रसंचालन केले. गणेश खोत यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!