सुपे (ता.बारामती) प्राजक्ता मतिमंद शाळेला आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने किरण गोडसे (वरे) फाऊंडेशन मळद-बारामती” च्या वतीने धान्याची मदत करण्यात आली.
बारामती ( फलटण टुडे ):
मंगळवार दि. ०६ डिसेम्बर रोजी मळद (ता.बारामती) येथील किरण गोडसे (वरे) फाऊंडेशनच्या वतीने मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी सुपे (ता.बारामती) येथील जीवन साधना फाऊंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी शाळेला धान्याची मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी १०० किलो विषमुक्त गहू दिला. याप्रसंगी मळदचे मा. सरपंच धनंजय गवारे, बारामती ता. ख. वि. संघाचे मा. सभापती दत्तात्र्यय कुतवळ, सामाजिक कार्यकर्ते अभिनय कुतवळ, प्रवीण कुतवळ व आदेश कुतवळ आदी उपस्थित होते. गेल्या एकवीस वर्षापासून शाळा विना अनुदान तत्वावर चालू असून, तालुक्यातील हे मोठे एकत्रित कुटुंब आहे. मतिमंद प्रवर्गातील विशेष मुलांचे संगोपन करण्याचे अवघड काम ही शाळा करत असल्याने भविष्यात आवश्यकती मदत करण्याचा मनोदय श्री. वरे व श्री. गवारे यांनी या वेळी व्यक्त केला. शाळेच्यावतीने व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी आभार मानले.