महाराष्ट्र राज्य एम.एड कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू जाधव व राज्य कार्यकारणीचे सदस्य.
मुंबई (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम. एड प्राथमिक शिक्षक कृती समितीच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास संदर्भात दहा ते बारा शाळेवर एक याप्रमाणे ४८६० केंद्रप्रमुखांची नियुक्ती १९९५ अधिनियमाद्वारे केलेली होती. परंतु त्यानंतर २०१४ च्या अधिनियमांमध्ये बदल करून ४० ३० ३० असा फॉर्मुला केंद्रप्रमुख निवडी संदर्भात पारित झालेला होता. त्या फॉर्मुलानुसार कार्यरत अनुभवी प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखपदी निवडीच्या अत्यल्प संधी होत्या तसेच ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे आत्तापर्यंत केंद्रप्रमुख भरती करता आलेली नव्हती आणि शैक्षणिक गुणवत्ता विकासाला अनेक जागा केंद्रप्रमुखांच्या रिक्त असल्यामुळे खिळ बसलेली होती गेले वर्षभर महाराष्ट्र राज्य एम.एड कृती समितीच्या वतीने शिक्षण मंत्री, ग्राम विकास मंत्री तसेच ग्रामविकास, शिक्षण विभाग सचिव पातळीवर निवेदनाद्वारे, भेटीद्वारे पाठपुरावा केलेला होता. महाराष्ट्र राज्य एम.एड कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस प्रदीप शिंदे,धुळे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भामरे, सातारा अध्यक्ष शिवजी माने, राज्य संपर्क प्रमुख सूर्यकांत दडस,राज्य प्रतिनिधी तथा राज्य प्रसिद्धिप्रमुख धन्यकुमार तारळकर, रत्नागिरीचे अध्यक्ष शिंगए, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कदम, जनार्धन बोटकर इतर कृती समितीच्या सदस्यांद्वारे मागील महिन्यामध्ये शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर साहेबांना भेटून नुकतीच चर्चा द्वारे हा प्रश्न केंद्र प्रमुख भरतीचा प्राथमिक शिक्षकांमधून शंभर टक्के भरती व्हावी अशा प्रकारचा आग्रह धरलेला होता. त्यानुसार १ डिसेंबर,२०२२ रोजी पारित झालेल्या जीआर नुसार परिपत्रकानुसार ५०% सीनियरिटी प्राथमिक शिक्षकांमधून आणि ५०% प्राथमिक शिक्षकांमधूनच विभागीय परीक्षेद्वारे प्रशिक्षित शिक्षक या प्रक्रियेतून भरती केली जाणार आहे. त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली केंद्रप्रमुखाची पदे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे.
परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिलेले आहेत त्या दुरुस्त होणे कामी उच्चशिक्षित एम. एड कृती समितीचे राज्याध्यक्ष लवकरच शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना भेटून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राज्य अध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले. वयाची अट काढणे, प्रशिक्षित शिक्षक बाबत असलेली संधीगता पदवीच्या गुणांमध्ये असलेली मार्कांची अट अशा प्रकारच्या त्रुटी संदर्भात चर्चा करून सर्व प्रशिक्षित बीएड ,एम. एड अशा उच्च शिक्षकांना संधी मिळावी अशा प्रकारची मागणी राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी केली.