फलटण : येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत जय हनुमान तालीम संघाचे पाच मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
नुकत्याच फलटण येथे पार पडलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत आसू येथील ज्योतिर्लिंग हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये 70 किलो वजनी गटात अभिषेक दत्तात्रेय भोई याचा प्रथम क्रमांक 65 किलो वजनी गटात अनुराज कालीचरण नामदास याचा प्रथम क्रमांक तर 55 किलो वजन गटात निलेश जाधव याचा प्रथम क्रमांक 71 किलो वजनी गटात मंथन गेजगे यांनी प्रथम क्रमांक तर मोनिका दादासाहेब गेजगे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला त्यांची कराड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, आसू चे सरपंच महादेवराव सकुंडे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद झांबरे, आसू गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, प्रगतशील बागायतदार अर्जुनराव खारतोडे पाटील, माजी सरपंच पैलवान नितीन शेडगे, पैलवान हनुमंतराव फडतरे ,आसू नंबर एक विविध सोसायटीचे चेअरमन पैलवान रवी ढवळे पैलवान रावसाहेब शिरतोडे पैलवान बाबू भुजबळ पैलवान अश्फाक शेख पैलवान हर्षद डोंबाळे यांच्यासह विविध मान्यवरांनी जय हनुमान तालीम मंडळ व तालीम मंडळाचे वस्ताद बाळासाहेब साबळे व विजय मल्लांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.