गोखळी (. प्रतिनिधी) मुधोजी महाविद्यालय फलटण येथे नुकत्याच झालेल्या तालुका स्तरावरील कुस्ती स्पर्धेत गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयातील चार कुस्ती स्पर्धा गाणी चमकदार कामगिरी केली असून या चौकांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये पै. हनुमंत गावडे हरिश्चंद्र गायकवाड कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. १७ वर्षांखालील ६५किलो फ्रि स्टाईल कुस्ती स्पर्धेत गोखळी येथील हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११वीतील विद्यार्थी पै. हणमंत अशोक गावडे ने प्रथम क्रमांक पटकावला तर इयत्ता १० वीतील ७१किलो फ्री स्टाईल स्पर्धेत मंथन जगन्नाथ गेजगे यांने प्रथम क्रमांक पटकावला. ८० किलो फ्रि स्टाईल कुस्ती स्पर्धेत इयत्ता ११वी.तील विद्यार्थी पै. हरिश्चंद्र गोविंद गायकवाड ( प्रथम क्रमांक) पटकावला. तसेच पुणे विभागातून इंदापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत हनुमान विद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु. श्रुती जगन्नाथ गेजगे हिने 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिची जुन्नर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पुरुष गटातून तीन व महिला गटातून एक अशा चार कुस्ती स्पर्धेकाची जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धकाना वस्ताद पै.अनिल गावडे, वस्ताद साबळे यांनी मार्गदर्शन केले.या यशस्वी स्पर्धकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैय्या कदम, सचिव शारदादेवी कदम, प्राचार्य हरिभाऊ अभंग, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै.बजरंग गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गावडे, वस्ताद पै. बाळासाहेब साबळे ( आसू) ,वस्ताद पै. अनिल गावडे, मोहन ननावरे,किरण पवार, विकास घोरपडे,सौ.सुप्रिया धायगुडे- लोखंडे,सौ. शुभांगी भोसले- बोंद्रे, दादासो अहिरे यांनी अभिनंदन केले.