" जनजातीय गौरव " दिवस निमित्ताने बारामती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोखळी ( प्रतिनिधी):   ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) यांच्या संयुक्त विद्यमाने ” जनजातीय गौरव ” दिवस  निमित्ताने बारामती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन  कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे प्रमुख , वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.धीरज शिंदे यांचे हस्ते झाले यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ धिरज शिंदे    म्हणाले की  , आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी भारताला स्वातत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रंजांसोबत केलेल्या युद्धांत केलेल्या कामगिरीला उजाळा देत, आदिवासी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी सोबत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी  प्रकल्प समन्वयक आणि विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे डॉ. मिलिंद जोशी ( TRTI) यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संस्थेत सुरु असणाऱ्या विविध योजना तसेच सदर जिल्ह्यामध्ये तयार होणारे विविध पदार्थ व त्यांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न पदार्थ उद्योग योजना (PMFME) या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये यवतमाळ येथील आदिवासी विद्यार्थी कु.शिवम मेश्राम आणि ग्रुप यांनी आदिवासी दंडा नृत्य, कु.सोनम उईके आणि ग्रुप यांनी आदिवासी ढेमसा नृत्य, उमा भुरके आणि ग्रुप यांनी गोंडी नृत्य, प्रीतम कोटनाके आणि ग्रुप यांनी आदिवासी कुरकु गोंड पारंपारिक वेशभूषा, मंगेश किन्नाके आणि ग्रुप यांनी महिला सबलीकरण पथनाट्य, चेतन फुपरे, हर्षाली जुमनाके,  दुर्गा ढोके यांनी आदिवासी कलाकृती आणि आदिवासी समाज सक्षमीकरण यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर पूजा मडावी, अजय मडपाचे, अखिल अत्राम, दिपाली सलाम, सागर रिंगणे इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
  प्रशिक्षण  समन्वयक कृषी विज्ञान केंद्राचे  प्रशांत गावडे आणि कु. शिवानी सलाम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर  अक्षय कुंभार यांनी  आभार मानले.
यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर चे नर्सिंग कॉलेज येथील प्राध्यापिका सौ. अश्विनी जाधव आणि सौ. प्रभा रणपिसे यांसह पुणे, यवतमाळ, नागपूर, नांदेड, बीड आणि वाशीम जिल्ह्यातील १७७ विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!