फलटण :
26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2022 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संविधान मधील प्रस्ताविकेचे वाचन व वाटप
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार समीर यादव साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून केली.
तसेच प्रस्ताविकेचे वाचन पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे साहेब यांनी केले व प्रस्ताविकेचे वाटप फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला मुधोजी हायस्कूल फलटण,प्रबुद्ध विद्या भवन फलटण, लॉ कॉलेज फलटण,फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल अॅणड ज्युनिअर काॅलेज फलटण,उर्दू प्राथमिक शाळा फलटण चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
तसेच मुधोजी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम सर व डॉ. प्रभाकर पवार सर यांनी उपस्थिती दाखवली व संविधानाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांना कामगार संघर्ष संघटना यांच्या वतीने अल्प उपहार देण्यात आला.
तसेच कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते;
ऍड. अनिकेत अहिवळे(अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती),प्रतीक गायकवाड(उपाध्यक्ष), सुशांत अहिवळे(सचिव) व पदाधिकारी,सचिन अहिवळे(नगरसेवक फ.न.प.फ),दत्ता(सर) अहिवळे, विकास काकडे(सर),पत्रकार रमेश आढाव(सर),यशवंत कारंडे(मुख्याध्यापक),आबासाहेब यादव,एस.डी.कांबळे(सर),शाम(सर)अहिवळे,सागर सोरटे,महादेव गायकवाड(कामगार संघर्ष संघटना),चंदन काकडे(वस्ताद),सिद्धार्थ अहिवळे,मंगेश आवळे,ऍड.प्रशांत काकडे,ऍड. रोहित अहिवळे,ऍड.आशा काकडे,प्रशांत(आप्पा)काकडे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) चे पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडी चे फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे व त्यांचे पदाधिकारी उमेश कांबळे, सपना भोसले,अरविंद आढाव, अश्विनी अहिवळे उपस्थित होते.तसेच पत्रकार अरविंद मेहता,अमित भोईटे,अमीरभाई शेख,इम्रान नियाज अहमद कुरेशी,
महेजबिन तांबोळी (मुख्याध्यापिक),किस्मत पटेल (शिक्षक),
अक्रम जहांगिर मुल्ला (प्राचार्य).
तसेच या सर्वांना प्रस्ताविकेची प्रत देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.