कराड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
फलटण दि. २६ ( फलटण टुडे ) :-
शालेय कुस्ती स्पर्धो २०२२-२३ नुकत्याच मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे दिनांक २५ व २६ नोव्हेंबर रोजी पार पडल्या या स्पर्धा मॅटवरती पार पडल्या या स्पर्धेचे उद्धाटन मुधोजी महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ संजय दिक्षित सर यांच्या शुभहस्ते पारपडले
यावेळी बोलताना ते म्हणाले शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच, सर्वांगीण
विकासाच्या दृष्टीने खेळालाही महत्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्याकडून खेळाचे
नियमित सराव करून घेतल्यास विद्यार्थ्यांना यश निश्चीत च मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले
मॅटवरील तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या खालील विद्यार्थांनी यश संपादन केल .
१४ वर्षाखालील मुले
१ ) राजवीर रमाकांत ( बिटू ) भोसले ३५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक , २ ) साई दादासों तांबे ३८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
१७ वर्षाखालील मुले
१) निलेश अनिल जाधव ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
१४ वर्षाखालील मुली
१ ) सलोनी मंगेश ढेकळे ३९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
२ ) कु. गौरी रमेश चव्हाण ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
१७ वर्षाखालील मूली
१) राजनंदिनी सतिश रणवरे ४६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला
वरील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर नेत्रदिपक अशी कुस्ती करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. मुधोजी हायस्कूल चे क्रीडा मार्गदर्शक नानासाहेब तांबे व क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ यां सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमुख उपस्थिती शालेय कुस्ती स्पर्धा २०२२ – २३ आयोजन समिती चे पै.अजय कदम, पै.हिंदुराव लोंखडे, तुषार मोहिते,गोरख कदम, संदिप ढेबरे , वस्ताद बाळासाहेब साबळे , वस्ताद अर्जुनराव खारतोडे , दिलीप माने , अमोल नाळे , तायप्पा शेंडगे , वस्ताद राहूल सरक , निलेश खानविलकर , रमाकांत भोसले , अमरसिंह संकपाळ , उमेश शिंदे , कर्चे वस्ताद इत्यादी सह अन्य सन्मानिय मान्यवर उपस्थित होते.
मुधोजी हायस्कूल च्या यशस्वी कुस्तीपटू चे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान सदस्य मा. नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , क्रीडा सीमतीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे , प्रशासन अधिकारी अरविंद निकम , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य आण्णासाहेब ननावरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , मार्गदर्शक शिक्षक
यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.