माजी सैनिक संघटनेचे कार्य आदर्शवत : आनंद भोईटे

 

आनंद भोईटे यांच्या समवेत माजी सैनिक महिला बचत गटाच्या प्रतिनिधी ( फोटो : रामदास चव्हाण ) 

बारामती ( फलटण टुडे ) :
माजी सैनिकांनी देशसेवा केल्यानंतर समाज्याचे देणे लागतो या भावनेतून केलेली समाजसेवा कौतुकास्पद असून राज्यामध्ये बारामती तालुका जय जवान माजी सैनिक संघटनेचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन बारामती पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले. 
जय जवान माजी सैनिक संघटना बारामती तालुका व माजी सैनिक महिला बचत गट यांच्या वतीने नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व सैनिकाच्या गुणवंत पाल्याचा सत्कार समारंभ प्रसंगी आनंद भोईटे बोलत होते. 
या प्रसंगी जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबांळ्कर, कझाकिस्तान आयरमॅन ओम सावळेपाटील, आनंद भोईटे यांचे आई वडील सौ शारदा भोईटे, आप्पासो भोईटे व जयहिंद फौंडेशन चे अध्यक्ष राजेंद्र जगताप सर्व माजी सैनिक व त्यांचे परिवार आणि महिला बचत गट प्रतिनिधी, सदस्या मोठ्या संख्येने 
 उपस्तित होते. 
देशसेवा व समाजसेवा करीत माजी सैनिकांनी स्वतःची वेगळी ओळख राज्यात निर्माण केली आहे कोरोना, पूर, वृक्षारोपण, रक्तदान, बचत गट आदी माध्यमातून सामाजिक कामे स्फूर्तिदायक असल्याचे आनंद भोईटे यांनी सांगितले. 
 सैनिक निवृत्त झाल्यानंतर त्यास रोजगार मिळवून देणे, शासकीय स्तरावर मदत मिळवून देणे,त्याच प्रमाणे विविध उपक्रमासाठी शासनाला व पोलीस प्रशासनाला मदत करत असताना माजी सैनिकाच्या पाल्यास शाबासकी ची थाप म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबांळ्कर यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या माजी सैनिक व गुणवंत पाल्याचा आणि माजी सैनिक कै. कांतीलाल सावळेपाटील यांचे नातू आयरमॅन ओम सावळेपाटील यांचा सत्कार करण्यात आला. 
अजय निबांळ्कर, सुषमा भोसले, राजेंद्र जगताप आदींनी माजी सैनिकाच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. 
 सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार राहुल भोईटे यांनी मानले. 






चौकट : 
महाराष्ट्रात माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्या साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे बारामती तालुका जय जवान माजी सैनिक संघटना यांनी विशेष पाठपुरावा केल्यामुळे यश प्राप्त झाल्याचे हनुमंत निबांळ्कर यांनी सांगताच माजी सैनिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!