१७ वर्षाखालील स्पर्धेत विजयी मुधोजी हायस्कूल संघाचे अभिनंदन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , ज्युनिअर चे उपप्राचार्य फडतरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , क्रीडा मार्गदर्शक अमोल नाळे , सोमनाथ चौधरी व धनश्री क्षिरसागर
फलटण (फलटण टुडे ):
२१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर रोजी मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पारपडलेल्या १४ , १७ व १९ वर्षा खालील सी के नायडू शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. एच . कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उपस्थित १४ , १७ व १९ वर्षाखालील संघाच्या विद्यार्थांना मागदर्शन करून संपन्न झाला . या स्पर्धा दोन दिवस चालल्या 22 नोव्हेंबरला या स्पर्धेचे अंतीम सामने पार पडले . यामधे १४ वर्ष खालील स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे CBSE तर १७ वर्षाखालील स्पर्धेत मुधोजी हायस्कूल आणि १९ वर्षांखालील स्पर्धेत मालोजीराजे विद्यालय विजयी ठरले
यावेळी फलटण तालूका क्रीडा समन्वयक गणेश गायकवाड , मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य वेदपाठक , फलटण क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे , क्रीडा शिक्षक स्वप्नील पाटील , धनश्री क्षिरसागर , अमोल नाळे , अमित काळे , तायप्पा शेंडगे , राहूल पोतेकर , सुहास कदम , कुमार पवार , सोमनाथ चौधरी , टिल्लू चौधरी , अविनाश अहिवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळ प्रथम १४ वर्षा खालील संघाचे सामने झाले यावेळी या गटाचा अंतीम सामना श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) ज्युनिअर कॉलेज जाधववाडी व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( ssc ) ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण यांच्यात झाला यामधे श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांनी श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( ssc ) ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण यांच ७ गडी राखून पराभव केला .
तसेच १७ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) व ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांच्यात झाला यामधे मुधोजीने श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) चा ३० रनने पराभव केला
१९ वर्षा खालील स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालय यांनी श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( ssc ) व ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांचा ३५ रनांनी पराभव केला .
वरील तिन्ही विजयी संघ जिल्हास्तरीय सी के नायडू स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकूल सातार येथे होणाऱ्या सी के नायडू स्पर्धेसाठी जिल्ह्यातील इतर संघांशी स्पर्धेत सहभागी होतील .