बारामती ( फलटण टुडे ) :
दि.14 नोव्हेंबर रोजी पंडित
जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिना निमित्त बारामती येथील इंडसइंड बॅंक बारामती शाखेच्या वतीने जनहित प्रतिष्ठान चे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी चित्रकला स्पर्धा परीक्षा आयोजन करुन बालदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक किरण फडतरे व अभिषेक जगताप, पृथ्वीराज चव्हाण, दीपाली जाधव आदी व जनहित प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्तित होते.
यावेळी घेतलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक. कु. आराध्य सुनिल होळकर
दुतीय क्रमांक. कु. आरोही अतुल गरदडे
तृतीय क्रमांक. चि.कैवल्य रोहित सोनावणे या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
अभ्यास, खेळ यांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना थोडीफार बँकिंग क्षेत्राची ओळख निर्माण होणे साठी इंडसइंड बॅंक च्या वतीने चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आल्याचे इंडसइंड बॅंक व्यवस्थापक किरण फडतरे यांनी सांगितले आभार अभिषेक जगताप यांनी मानले.
——————————-