बारामती :
जळोची, रुई, सावळ परिसरातील जळोची विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी जळोची येथील अर्जुन पागळे व रुई येथील रोहितदास चौधर यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रय आवाळे, दीपक मलगुंडे, अतुल बालगुडे, डॉ राजेंद्र चोपडे, मछिंद्र चौधर, शैलेश बगाडे,धनंजय जमदाडे माजी अध्यक्ष महादेव चौधर व संस्थेचे सचिव तुकाराम बिचकुले
आदी मान्यवर व सर्व संचालक मंडळ सभासद उपस्तित होते.
सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध राहू संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी कार्यरत राहू असे निवडीनंतर अर्जुन पागळे यांनी सांगितले.
उपसितांचे स्वागत उपाध्यक्ष रोहितदास चौधर यांनी केले आभार सचिव तुकाराम बिचकुले यांनी मानले.