बारामती :
बारामती येथील दंतरोग तज्ञ व रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ सौरभ दोशी ( ढाकाळकर )
यांनी गोवा येथील स्पर्धा पूर्ण करून बारामती मधील दंतरोग क्षेत्रातील पहिले आयर्नमॅन होण्याचा किताब गोवा येथे मिळवलेला आहे.
योसका इव्हेंट, गोवा यांच्या वतीने रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत डॉ दोशी यांनी भाग घेऊन 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालविणे,
21. 1 किमी पळणे हे तिन्ही क्रीडा प्रकार 7 तास 28 मिनिट मध्ये पूर्ण करून आयर्नमॅन हा ‘किताब पटकावला आहे.
दंतरोग तज्ञ व रूट कॅनल स्पेशलिस्ट म्हणून त्यांची खास ओळख आहे.
रोजची प्रॅक्टिस करीत रोज सराव करून कझाकिस्तान आयर्नमॅन ओम सावळेपाटील, अवधूत शिंदे, विपुल पटेल, दिग्विजय सावंत यांनी मार्गदर्शन केले तर डॉ सौरभ दोशी यांच्या पत्नी ऐश्वर्या, आई अनिता व वडील डॉ राजेंद्र दोशी यांनी विशेष सहकार्य केले.
मुख्य प्रशिक्षक म्हणून योसका इव्हेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपकराज यांनी प्रशिक्षण दिले.
सदर स्पर्धाचा बक्षीस समारंभ प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गाऊंडे आदी मान्यवर व योसका इव्हेंट चे पदाधिकारी व देशभरातील ट्रॅयथॉन चे खेळाडू उपस्तित होते