कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जीवनभर कटीबद्ध : नानासो थोरात

कर्मचारी व अधिकारी यांच्या सत्कार प्रसंगी हनुमंत जगताप,  नानासो थोरात व इतर 

बारामती : 
 कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम व प्रामाणिकपणा व सकारत्मक विचारसरणी मुळे  कंपनी म्हणजे आपले  कुटूंब होय हि  विचारधारा रुजून त्याप्रमाणे प्रत्येक कर्मचारी कार्यरत असून  कर्मचाऱ्याच्या हितासाठी  जीवनभर कटीबद्ध राहू असे प्रतिपादन श्रायबर  डायनामिक्स डेअरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे युनियन अध्यक्ष नानासो थोरात यांनी केले. 
श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने भारतरत्न डॉ. राधा कृष्ण गोल्ड मेडल अवॉर्ड विजेते व्हेटरनरी विभाग प्रमुख प्रवीण पाटील, सेवानिवृत्त कर्मचारी आर एन सिंग, छगन शिंदे यांच्या सत्कार समारंभ व युनियन  सह खजिनदार गुलाब पठाण यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात  अध्यक्ष  नानासो थोरात  यांनी प्रतिपादन केले. 
या प्रसंगी श्रायबर  डायनामिक्स डेअरी चे प्रकल्प प्रमुख हनुमंत जगताप  व 
युनियन उपाध्यक्ष हनुमंत कोकरे, सरचिटणीस गजानन भुजबळ, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, खजिनदार गणेश जगताप, सहचिटणीस ओंकार दुबे, सहचिटणीस तुलसीदास मोरे, सह खजिनदार गुलाब पठाण व कर्मचारी उपस्तित होते. 
कंपनी म्हणजे आमचे  कुटूंब असून 
कंपनी व प्रशासन या मध्ये समन्व्य ठेवून कर्मचाऱ्याच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहू त्याच प्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत पदक विजेते अधिकारी यांनी कंपनीच्या वैभवात भर घातल्याचे श्रायबर डायनॅमिक्स डेअरी युनियन अध्यक्ष नानासो थोरात यांनी सांगितले.
कंपनी नेहमी,नियमित उत्तम,  आदर्शवत, गुणवंत कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहील व सेवानिवृत्त कर्मचारी व पदक विजेते प्रवीण पाटील यांच्या कार्यामुळे श्रायबर डायनॅमिक्स चा नावलौकिक वाढल्याचे प्रकल्प प्रमुख हनुमंत जगताप यांनी सांगितले. 
युनियन ने सत्कार घेऊन कार्याची उत्तम दखल घेतल्याचे कर्मचारी व अधिकारी यांनी सांगितले 
सूत्रसंचालन राजेंद्र काकडे यांनी केले तर आभार सरचिटणीस  गजानन भुजबळ यांनी मानले.
—————————————
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!