आयोध्यात ज्ञानसागरला डिजिटल स्कुल ऑवार्ड

बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रेटरनिटी (IUEF)  ग्रुपच्या *चौथ्या इंटरनॅशनल परिषदेत उत्तर प्रदेशमधील आयोध्या* या ठिकाणी पार पडली.या परिषदेत *बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलला Advaned classroom technologies शाळा पुरस्कार* देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेतर्फे अध्यक्ष सागर आटोळे यांनी स्वीकारला.
सागर आटोळे म्हणाले, ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सतत विविध उपक्रम राबविले जातात. सन *2021-22 या शैक्षणिक वर्षात या शाळेतील सर्व क्लासरूम मध्ये एलसीडी प्रोजेक्टर च्या माध्यमातून शिक्षण* दिले जाते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मदत होते व या  शाळेमधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले. त्यांचा आढावा घेऊन इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रेटरनिटी (IUEF)  ग्रुपने शाळेची निवड केली. इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रेटरनिटी (IUEF)  ग्रुपची आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद उत्तर प्रदेशमधील आयोध्या या ठिकाणी पार पडली. या वेळी पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सीबीएसईचे सचिव मा.अनुराग त्रिपाठी , आयोध्याचे एसपी पंकज पांडे, इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रेटरनिटी (IUEF)  ग्रुपचे अध्यक्ष जयंत चौधारी, सेक्रेटरी सुजित जाना, डायरेक्ट अमिता पंडित उपस्थित होत्या.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!