५५ वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उस्मानाबादला

महाराष्ट्राचा पुरुष महिला खो-खो संघ जाहीर  

मुंबई १० नोव्हें. ( फलटण टुडे.) :
 उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ५५ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ राज्य संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. या संघाचे सराव शिबिर उस्मानाबाद येथे खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून सुरु होणार आहे.

पुरुष संघ : अनिकेत पोटे, निहार दुबळे, अक्षय भांगरे, ॠषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले (सर्व पुणे), लक्ष्मण गवस, गजानन शेंगाळ (सर्व ठाणे), सुरज लांडे, अक्षय मासाळ (सर्व सांगली), रामजी कश्यप (सोलापूर), दिलीप खांडवी (नाशिक), सुरज शिंदे (हिंगोली), सनी नायकवडी (उस्मानाबाद).

राखीव खेळाडू : ॠषभ वाघ (पुणे), अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), वेदांत देसाई (मुंबई). प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), व्यवस्थापक : नरेंद्र रायलवार (हिंगोली), फिजीओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).

महिला संघ : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, दिपाली राठोड (सर्व पुणे), रुपाली बडे, पूजा फरगडे, रेश्मा राठाडे (सर्व ठाणे), संपदा मोरे, अश्‍विनी शिंदे, गौरी शिंदे (सर्व उस्मानाबाद), अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), प्रिती काळे (सोलापूर).

राखीव खेळाडू: सोनाली पवार (नाशिक), किरण शिंदे (उस्मानाबाद), स्नेहल चव्हाण (सांगली). प्रशिक्षक : प्रविण बागल (उस्मानाबाद), व्यवस्थापिका : सौ. माधुरी कोळी (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक:  सौ. प्राची वाईकर (पुणे).

दोन्ही संघांचे कर्णधार शिबीर समारोपावेळी जाहीर केले जातील असे संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी संगितले आहे. हिंगोली येथे झालेल्या राज्यअजिंक्यपद व निवड चाचणी पुरुष-महिला खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या १५-१५ जणांच्या संघाची निवड करण्यात आली. यासाठी राज्य खो-खो असोसिएशनने चार सदस्यीय निवड समिती नेमली होती. यामध्ये नागनाथ गजमल, प्रशांत देवळेकर, संदेश आंब्रे, सौ. सुप्रिया गाढवे यांचा समावेश होता. समितीने निवडलेला संघ उस्मानाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या खेळाडूंचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्याचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. या संघांनी मागील राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल कामगिरी केली होती.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!