फलटणमध्ये हॉकीचे आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील : क्लिअरन्स लोबो

 बक्षिस वितरण समारंभात मार्गदर्शन करताना भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्लिअरन्स लोबो व उपस्थित महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर

फलटण दि.08 :
श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक हॉकी स्पर्धा 2022 च्या बक्षीस वितरण समारंभ भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्लिअरन्स लोबो व महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर, द्वितीय क्रमांक मुंबई कस्टम मुंबई व या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचे मानकरी कोल्हापूर पोलीस कोल्हापूर हे ठरले व चतुर्थी क्रमांक फलटण हॉकी असोसिएशन फलटण यांनी मिळवला.
या सर्व स्पर्धेतून बेस्ट फॉरवर्ड म्हणून तन्मय जाधव (महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर) याची तर बेस्ट डिफेन्स- पंकज सिंग (मुंबई कस्टमर मुंबई) व बेस्ट हाफ -भावेश रायते (फलटण हॉकी असोसिएशन फलटण) आणि बेस्ट गोलकीपर – अथर्व पवार (फलटण हॉकी असोसिएशन फलटण) व टूर्नामेंट ऑफ द प्लेयर – भीम बाटला (मुंबई कस्टम मुंबई) यांची निवड करण्यात आली. या सर्वांना बेस्ट प्लेयरची ट्रॉफी देण्यात आली व टूर्नामेंट ऑफ द फेअरला रोख रुपये रक्कम १०००/-देण्यात आले.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक संघाला रोख रुपये २१००० व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक संघाला रोख रुपये १५००० व ट्रॉफी, तृतीय क्रमांक संघाला रोख रुपये ११०००  ट्रॉफी देण्यात आली. प्रथम क्रमांकास  महेश खुटाळे यांनी तर द्वितीय क्रमांकास  महेंद्र जाधव व तृतीय क्रमांकास  बाहुबली शहा यांनी रोख  पारितोषिक दिले. तसेच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक , बेस्ट प्लेयर सन्मान चिन्ह या  ट्रॉफीज फलटणचे सर्व पोलीस खात्यातील व एफसीआयचे खेळाडूं यांन दिल्या.
बक्षीस वितरण समारंभाच्या वेळेस भारतीय हॉकी प्रशिक्षक मा. क्लरेन्स लोबो यांनी फलटण सारख्या छोट्या गावामध्ये आपण उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन केले आहे असे म्हटले. फलटण तालुक्यातून सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत. फलटण मध्ये हॉकीची परंपरा 1977 पासून सुरू आहे जवळजवळ 45 वर्ष  हॉकी सुरू आहे. जर फलटणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे (astoturf) मैदान तयार झाल्यास अजून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू नक्कीच तयार होतील व त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 
अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी सुद्धा लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान (astroturf) तयार करू तसेच आगामी काळामध्ये यापेक्षाही मोठ्या हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
या बक्षीस वितरणा प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटी च्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. शिवाजीराव घोरपडे, ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक मा. जगन्नाथ धुमाळ , मा. महादेव माने , मा. नितीन भोसले, मा. राहुल निंबाळकर, मा. जगन्नाथ उर्फ भाऊसाहेब कापसे, , मा. तुषार नाईक निंबाळकर , मा. जावेद तांबोळी, मा. अमरसिंह खानविलकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी. कदम, डॉ. सुनील बर्वे,  डॉ. दीपक शेंडे  बाळासाहेब मेटकरी,  दादासाहेब चोरमले,  डॉ. बाळासाहेब शेंडे,  नितीन भोसले, श्री अशोकराव सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्र हॉकी च्या वतीने पंचांचे पॅनल आमंत्रीत करण्यात आले होते. या स्पर्धेचे टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून  दिग्विजय नाईक यांनी काम पाहिले ,पंच मॅनेजर म्हणून कस्टम ऑफिसर  सुमित मोहिते यांनी काम पाहिले. तसेच पंच पॅनल मध्ये फलटणचे राष्ट्रीय खेळाडू विजय पोतेकर व नटराज क्षीरसागर यांनी देखील काम पाहिले.
सदर स्पर्धेचे आयोजन या स्पर्धेचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  महेंद्र जाधव ,  महेश खुटाळे  सुजित निंबाळकर,  प्रवीण गाडे,  सचिन लाळगे,  सुहास ढेकळे, सुमित मोहिते, अभिजीत कदम,  खुरंगे बी.बी , गणेश पवार,  संदीप ढेंबरे, विपुल गांधी, तायप्पा शेडगे, अय्याज शेख, मोहसीन बागवान, दत्तू जाधव, भैय्या असलेकर, मौसम दोशी, मंगेश शिंदे तसेच फलटणच्या सर्व आजी-माजी खेळाडूंनी सहकार्य केले.
तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी  मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगवणे बी .एम, सगुणामाता कन्स्ट्रक्शन चे  दिलीप शिंदे व फलटण नगरपरिषद फलटण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन सचिव सचिन धुमाळ यांनी केले. व  आभार राष्ट्रीय हॉकी खेळाडू  सचिन लाळगे यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!