सातारा जिल्हा पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन-सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

 अतुल कुंभार यांची सातारा जिल्हा पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना महाराष्ट्र अॅम्युचअर खो -खो असोशिएशन चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा दि ९ : 
गेले महिनाभर सातारा जिल्हा पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीची भरपूर चर्चा सुरु होती. संपूर्ण सातारा पोलीस दलासह जिल्ह्याचे त्याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी मतदान झाल्यानंतर मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री निकाल लागला असता सत्ताधिकारी प्रगती पॅनेलचा पराभव झाला. यामध्ये १५ – ० अशा फरकाने परिवर्तन-सहकार पॅनेल विजय झाले.

यावेळी विजयी उमेदवार पोलिसांनी गुलाल उधळून जल्लोष केला.सातारा पोलीस सोसायटीमध्ये १५ संचालक आहेत. त्यासाठी ३ पॅनेलमध्ये थेट निवडणूक झाली. पोलिसांची सोसायटी असल्याने पोलिसांनी ती आपल्याकडे राखण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवला
होता. जिल्ह्यातील १८०० पोलीस या सोसायटीचे सभासद असून या पंचवार्षिक निवडणूकीसाठी तब्बल १५४९ पोलीस मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का वाढल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

पोलीस करमणूक केंद्रात मतपेट्या आणल्यानंतर सायंकाळीमतमोजणीला प्रारंभ झाला. यामध्ये परिवर्तन-सहकार या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. याचे नेतृत्व पोलीस शरद बेबले,पृथ्वीराज घोरपडे , सुरेश घोडके , सुनिल भिंगरे व आनंदराव भोईटे यांनी केले.

विजयी उमेदवार कांतीलाल नवघने,अविनाश चव्हाण, ऋतुराज शिंदे, विनोद गायकवाड सनी आवटे,
अतुल कुंभार, पृथ्वी जाधव, संजय जाधव, जयश्री कदम, संग्राम फडतरे, आनंदराव भोईटे, ओमकार यादव, अनिता हिरवे, मोहन नाचन, अनिल पवार हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले .

यामध्ये फलटण येथील पण सध्या लोणंद पोलिस स्टेशन मध्ये हवालदार या पदावर कार्यरत असलेले अतुल जगत्राथ कुंभार यांची सातारा जिल्हा पोलिस को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष तथा महाराष्ट्र अॅम्युचअर खो -खो असोशिएशन चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केला यावेळी त्यांनी अतुल कुंभार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्योचे या निवडीबद्दल अभिनंदन केले . 

यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब शेंडे , फलटण तालूका दुध संघाचे चेअरमन श्री धनंजय पवार , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री महादेवराव माने , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री माणीकराव सोनवलकर , युवा उद्योजक तुषार (भैय्या ) नाईक निंबाळकर , श्रीमंत शिवाजीराजे कायम सेवक पतसंस्था चेअरमन श्री जगत्राथ उर्फ भाऊसाहेब कापसे , अक्षय तांबे, रणजीत बर्गे ,किरण जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!