सातारा दि. ७: सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकाराचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरुन नविन व नुतनिकरण अर्जची ऑनलाईन स्वीकृती दि. 29 सप्टेंबर 2022 पासुन सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य ती मदत करुन समान संधी केंद्र समिती मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याबबात कार्यवाही करुन घ्यावी. अर्जाची पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अदागायी होण्यासाठी सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.