अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना आवाहन

सातारा दि. 7 : 
जिल्ह्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाराधारकांना आवाहन करण्यात येते की, रास्त भाव दुकानदार यांचेकडून आपणास नियमित अन्ना धान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 जिन्नसांचा समावेश असलेला 1 संच शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात मिळाला नसेल तर किंवा रास्त भाव दुकानदार यांनी शिधाजिन्नस संच वाटपामध्ये गैरप्रकार, अपहार केल्याची बाब निदर्शनास आली तर, आपली तक्रार तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे करावी. निश्चितच आपल्या तक्रारीची शहानिशा, चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!