शिवाजी विद्यापीठाच्या 42 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयास घवघवीत यश

फलटण ( फलटण टुडे ) :

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवात १लोकसंगीत वाद्यवृंद सलग तीन वर्षे प्रथम २ लघुनाटिका -द्वितीय ३ पाश्चिमात्य समूहगीत-द्वितीय तर ४भित्तिचित्रण-द्वितीय ५व्यंगचित्रण-तृतीय ६ स्थळ छायाचित्रण -द्वितीय ७नकला-तृतीय ८ पाश्चिमात्य एकलगायन-उत्तेजनार्थ असे सांघिक व वैयक्तिक आठ स्पर्धाप्रकारात महाविद्यालयाने यशाची परंपरा अबाधित ठेवून शिवाजी विद्यापीठात आपले स्थान कायम ठेवले आहे त्याबद्दल प्राचार्य डॉ. पी. एच. कदम  तसेच कलाविष्कार विभागप्रमुख प्रा.लक्ष्मीकांत वेळेकर तसेच प्रा. विशाल गायकवाड, प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी, प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. मोनिका शेंडे , प्रा. गायत्री पवार व प्रा.सौ. शिल्पा शिंदे या समिती सद्यस्यांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,नियामक मंडळाचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सेक्रेटरी  मा. श्रीमंत संजीवराजे  नाईक निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाच्या संघात ओम शिंदे,ओंकार दाने, राधा गायकवाड, विजय क्षीरसागर, जान्हवी जाधव या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली त्याबद्दल सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे व कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांचे कौतुक होत आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!