महेश भापकर यांच्या हस्ते सत्कार करताना सातारा जिल्हा बँकेचे फलटण विभागाचे विभागीय विकास आधिकरी अजितराव निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे ( आनंद पवार ) :
सातारा जिल्हा बँकेचे कर्मचारी हे प्रामाणिक काम करत आहेत.बँकेच्या ग्राहकांशी नेहमीच माणुसकीचे नाते जपण्याचे महत्वपूर्ण कार्य हे कर्मचाऱ्याच्या कडून सुरू असून महेश भापकर यांनी प्रामाणिकपणा दाखवून जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या नवलावकिकात भर टाकणारा ठरेल असे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे फलटण विभागाचे विभागीय विकास आधिकरी अजितराव निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राजाळे ता.फलटण येथील शाखेतील कर्मचारी महेश भापकर यांनी आठ ग्राम सोन्याची आंगठी प्रामाणिक पणे संबधित व्यक्तीला परत केली त्याबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या सचिव व उपसाचीवनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी आविनाश खलाटे ,बापूराव गोडसे,प्रवीण ढेंबरे यांच्यासह तालुक्यातील सर्व सोसायटीचे सचिव उपसचिव उपस्थित होते. महेश भापकर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणातून त्यांच्या वागण्या बोलण्यातील सत्यता शिस्तप्रियता चांगली वागणूक आणि विश्वासार्हता इत्यादी गुणवैशिष्ट्य हे त्यांच्यामध्ये दिसून येतात त्यांच्या नैतिक स्वभावाची ओळख होते त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल परमेश्वरांनी त्यांच्या जीवनात प्रापंचित सुख समाधान निरोगी आणि आर्थिक सुबोधता बरोबर घेऊन देईल अशी श्री निंबाळकर यांनी परमेश्वराकडे या कार्यक्रमातच प्रार्थना केली.
त्यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाली की जिल्हा बँकेतील कर्मचारी हे इमाने इतवारी सेवा करत आहेत त्याचबरोबर ग्राहकांची हीच लक्षात घेत आहेत राजाळे तालुका फलटण येथील जिल्हा बँकेचे कर्मचारी श्री महेश भापकर यांनी त्यांना सापडलेली आठ ग्रॅम सोन्याची अंगठी संबंधित त्यांना मनामध्ये कोणताही आकस न बाळगता प्रामाणिकपणे त्यांना ती परत केल्याने ही सर्वांसाठी एक आनंदाची बाब असल्याने आज जिल्हा बँकेच्या सर्व सोसायटीच्या माध्यमातून हा सत्कार समारंभ कर्मचाऱ्यांना नक्कीच त्यांच्या प्रामाणिक कामाचा परिपाक देणारा व सर्व कर्मचाऱ्यांना हा सत्कार प्रेरणादायी ठरणार असेल असे निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमास फलटण विभागीय शाखेतील कर्मचारी अधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते