साई बाबाचे विचार आजही मार्गदर्शक :सुनेत्रा पवार

गेली दहा वर्ष  बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा

बारामती ते शिर्डी पायी पालखी चे पूजन करताना सुनेत्रा पवार व आयोजक बिरजू मांढरे व प्रियांका मांढरे (छाया प्रशांत कुचेकर )
बारामती ( फलटण टुडे ) :
 श्रद्धा आणि सबुरी या  महान वचनाचे पालन करीत  सामाजिक एकात्मता जोपासत साईच्छा सेवा ट्रस्टने  केलेले कार्य कौतुकास्पद असून साई बाबाचे विचार आजही मार्गदर्शक  असल्याचे असल्याचे प्रतिपादन बारामती हाय- टेक  टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 
 मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या  संकल्पनेतून साईच्छा सेवा ट्रस्ट ने 
बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखीच्या  प्रस्थान प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या या प्रसंगी 
नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत जाधव, नवनाथ बल्लाळ, राजेंद्र बनकर व  तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी  होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील, विजय खरात, आणि किशोर मासाळ, अजीज शेख, सुजित जाधव, भारती मुथा, दिनेश जगताप,के.टी जाधव, राहुल मोरे  आदी मान्यवर उपस्तित होते. 
दहा वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षात पदार्पण करताना बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, फलटण  व नगर जिल्यातील अनेक साईभक्त सहभागी होत असतात शिर्डी मध्ये गुजरात,  आंध्र प्रदेश,व महाराष्ट्रातून अनेक साई पालख्या येतात परंतु शिस्तबद्व व साई   विचार तळागाळात पोचविणारी बारामती तालुक्यातील एकमेव साईच्छा सेवा ट्रस्ट ची पालखी लक्ष वेधून घेत असते पालखी च्या माध्यमातून अध्यात्मिक समाधान मिळत आल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले 
बारामती चा चौफर विकास असताना अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बारामती पाठीमागे नाही हे साई  पालखी च्या माध्यमातून दाखवून दिल्याचे  शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.
साई बाबांच्या विचार सरणीमुळे बिरजू मांढरे व मित्र परिवाराने उल्लेखनीय काम केले असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. 
या प्रसंगी पालखी सोहळ्यातील वाहक हरिभाऊ केदारी, गौंड व वासुदेव यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  अनिल सावळेपाटील यांनी केले 
सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवस व दीपावली पाडवा निमीत्त (बुधवार 26/10/2022)    साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘ साई दरबार ‘  या जगातील सर्वात महानाट्याचे आयोजन करण्यात आले  होते. 

चौकट : 
बिरजू मांढरे यांच्या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत चे बांधकाम पूर्ण होऊन लाभार्थी यांना हस्तांतर करणार असल्याचे नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले. 


 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!