फलटण( फलटण टुडे ):
प्रकाशनाआधीच संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व विक्रमी प्रतींची विक्री झालेल्या लेखक सचिन गोसावी लिखित ‘आरंभ है प्रचंड ‘ या प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खा.शरद पवार यांच्या हस्ते बारामती (गोविंदबाग) येथे पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी बाबुराव भोसले सर,प्रविण मोरे सर,विशाल गिरी सर,अॅडव्होकेट आकाश आढाव तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजपरिवर्तनाच्या उद्देशाने लिहिलेले हे प्रेरणादायी पुस्तक तरूणांसोबतच समाजातील प्रत्येक घटकास एक दिशादर्शक आहे.तसेच अल्पावधीतच हे पुस्तक महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले असेल,असा मला विश्वास वाटतो. तसेच
लेखक सचिन गोसावी यांनी समाजपरिवर्तनासाठी केलेले निर्भीड लेखन ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.त्यांची व त्यांच्या पुस्तकाची पुढील वाटचाल निश्चितच यशस्वी असेल,असे मत या पुस्तक प्रकाशनावेळी खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.