फलटण (फलटण टुडे ) :
श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये एकूण 182 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील विजेता विद्यार्थ्यांना आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मा. सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या कार्याचे नेहमी कौतुक करत असते,विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
*लहान गट*
– 1)प्रथम क्रमांक
कु. दीप्ती दीपक कवितके जि.प. शाळा मोहितेवस्ती ,
2)द्वितीय क्रमांक- कु.श्रेया शंकर दडस जि.प.शाळा नेवसेवस्ती,
3)तृतीय क्रमांक- कु. श्रावणी सुभाष बरकडे जि.प. शाळा जावली,
3) तृतीय क्रमांक – अपूर्व प्रशांत ढावरे जि.प.शाळा पाडेगाव
*मोठा गट* –
1)प्रथम क्रमांक- सर्वेश बंडू शिंदे, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल,
2)द्वितीय क्रमांक- सानिया दिलीप भंडलकर, जि.प.शाळा वाठार निंबाळकर,
3) तृतीय क्रमांक – शिवांजली दत्तात्रय निकाळजे, सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी,
3)तृतीय क्रमांक – आफरीन तजमुल शेख ,सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल.
आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते व श्रीमंत संजीवराजे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाल्यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना एक वेगळी प्रेरणा मिळालेली दिसून आली. यापुढेही आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.गणेश तांबे यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ ढेकळे,भीमराव बुरुंगले तुषार नाईक निंबाळकर, प्रा.विजयकुमार निंबाळकर, इत्यादी मान्यवर व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.