बारामती ( फलटण टुडे ) :
कोरोनाचे दोन वर्ष, वाढलेली महागाई, वाढता परतीचा पाऊस आदी कारणाने जनता मेटाकुटीला आलेली असताना गोर गरीबाची व खऱ्या गरजवंताची दिवाळी गोड होण्यासाठी नगरपरिषद चे मा सभापती सत्यव्रत काळे यांच्या आई प्रतिष्ठान ने केलेले कार्य कौतुकास्पद
असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
शनिवार 22 ऑक्टोम्बर रोजी मा.सभापती सत्यव्रत काळे यांच्या आई प्रतिष्ठान च्या वतीने एक हजार कुटूंबाना दिवाळी फराळ , अभ्यंग स्नान किट वाटप व महिलांना साड्या वाटप सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आल्या या प्रसंगी सुळे बोलत होत्या.
वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून महिलासाठी बचत गट स्थापन, तुळजापूर दर्शन, शिलाई मशीन वाटप व राष्ट्रवादी चे विचार तळागाळात पोहचवण्यासाठी सत्यव्रत काळे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
गोर गरिबांची दिवाळी गोड होऊन त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मा.सभापती सत्यव्रत काळे यांनी सांगितले.
या प्रसंगी काळे परिवाराच्या वतीने सुप्रिया सुळे यांना खास फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष
संभाजी होळकर,बारामती बॅंकचे चेअरमन सचिन सातव, नवनाथ बल्लाळ मा. उपनगराध्यक्ष,बानप, सौ शुभांगी चौधर, सौ.डॉ. सुहासिनी सातव मा नगरसेविका ,सौ आरती शेंडगे.अध्यक्ष, बारामती शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ, अनिताताई गायकवाड.अध्यक्ष,बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री राजेंद्र नाना ढवानपाटील, संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना,श्री अल्ताफ सय्यद,संचालक मुस्लिम बँक,श्री इमरान पठाण अध्यक्ष बारामती मुस्लिम युथ ,श्री विपुल ढवानपाटील, निलेश कोठारी,श्री संतोष जगताप,श्री मुस्तफा हवेलीवाला,श्री दिलीप ढवान पाटील, श्री पार्थ गालींदे,श्री आबा पागळे,श्री राहुल जाधव,तैनूर शेख, आदी मान्यवर उपस्थित होते .
. मान्यवरांचे स्वागत श्री सत्यव्रत अर्जुनराव काळे मा सभापती बांधकाम समिती अध्यक्ष आई प्रतिष्ठान यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले