यावेळी उपस्थित उपप्राचार्य ए वाय ननवरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , ग्रंथपाल अनीता बडवे, नितीन जगताप, अभंग सर, संजय गोफणे व इतर
फलटण ( फलटण टुडे ) : –
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन व वृत्तपत्र वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी एम गंगवणेहोते.
कार्यक्रमात सुरुवातीला डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य बी.एम गंगवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे वेगळेपण इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी तन्मय येळे याने डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची वेशभूषा केली होती व त्यानें डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी थोडक्यत माहिती सांगितली व त्यानें डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्नीपंख आत्मचरीत्राचे वाचन किती प्रेरणादायी आहे हे सांगितले व भविष्यात मी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करीन असे नमुद केले .
यावेळी बोलताना प्रशालेच प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी डॉ कलाम यांच्या रामेश्वर येथील घराला जेव्हा भेट दिली होती त्यावेळच्या त्यांनां अनुभवास आलेल्या गोष्टी विषय सांगताना ते म्हणाले एवढ्या उच्च पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीचे साधे राहणे व उच्च विचारा या विषयी सांगितले. त्यांनी आपल्या देशासाठी जे काही कार्य केले आहे ते न विसरण्या जोगे आहे देशात शेतकरी आणि जवान यांना फार महत्त्व आहे शेतकऱ्यामुळे आपण उपाशी झोपत नाही तसेच जवान सीमेवर देशाचे रक्षण करत असल्याने आपण सुरक्षित अशी झोप घेऊ शकतो. देश प्रेमाप्रती व देश संरकणाप्रती त्यांनी मिसाईल ची निर्मिती केली त्यामुळे डॉ कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. या संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या मिसाईल निर्मितीने शत्रूराष्ट्रात दहशत निर्माण केली आहे व त्यामूळे जगात आपल्या देशाचे नाव संरक्षण क्षेत्रात उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे व देशाला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांनी त्यांचा राष्ट्रपती पदाच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या ते कसे जीवन जगले याच्या अनेक आठवणी सांगितल्या .
तसेच यावेळी ग्रंथपाल सौ. बडवे ए. एस. यांनी पुस्तकांचे वाचन माणसाला कसे घडवते, पुस्तके लक्षात रहातात, भाषाशैली सुधारते, आकलन क्षमत सुधारते ,नीर क्षिर विवेक असं प्रत्येक गोष्टीमधून वाचनामुळे माणूस म्हणून जगताना अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य जगता येते . वाचकासाठी फक्त पुस्तकेच नव्हे तर कोणत्याही माध्यमाचा उपयोग करता येतो kindle , आयपॉड , इ -बुक , प्रतिलिपी असे वेगवेगळे प्रकार वापरले तरी चालेल पण लक्षात राहाण्यासाठी मात्र लिखीत वाचनाचा जास्त वापर उपयुक्त होतो असे सांगितले यावेळी त्यांनी सांगिले.
यावर्षी १५ ऑक्टोबर २०२२ हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन तसेच जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन अशा तिन्ही प्रकारे साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेता हा सकाळी लवकर सर्वांच्या घरोघरी जाऊन वृत्तपत्राचे वितरण करतो तेव्हा आपण आपल्या आसपासच्या देश व विदेश पातळीवरील तसेच जागतिकीकरणाच्या बातम्या वाचू शकतो त्याचे आभार मान्याप्रती हा दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून प्रशालेमध्ये दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे वाचन शिक्षक व विद्यार्थी यांनी केले. हात धुवा दिन साजरा करत असताना मागील दोन वर्षाच्या काळातील अनुभवावरून कोरोनाच्या काळात सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. हात न धुत्याणे अनेक संसर्गजन्य रोग होतात या पासून आपला बचाव होण्यासाठी हात नियमित स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजलो व आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो .
या कार्यक्रमास मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य ए वाय ननावरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , सौ. एस एन सस्ते , सौ.टि व्ही शिंदे , सौ एस अगवणे , सौ एस निंबाळकर नितीन जगताप, कुमार सोनवलकर, अभंग सर, संजय गोफणे, दत्तात्रय मोहिते, एन हुंबे , गणेश कचरे, बापूराव सूर्यवंशी, सचिन धुमाळ, अमोल नाळे इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होता .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक शिवाजीराव काळे यांनी केले तर आभार नितीन जगताप यांनी केले.