महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस.टी.कदम नँक समन्वयक प्रा.डी.जे. रणवरे , मार्गदर्शिका प्रा. प्रिंयाका खांडेकर आणि समवेत यशस्वी खो – खो महिला संघ.
म्हसवड ( फलटण टुडे ) : –
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय खो – खो महिला स्पर्धा २०२२ चे आयोजन मुधोजी महाविद्यालय , फलटण येथे दि. १७ आँक्टोंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा विभागातील विविध महाविद्यालयाचे संघानी सहभाग घेतला होता. श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडच्या संघाने पहिल्या फेरीत एल.बी.एस .महाविद्यालय, सातारा संघास नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.व दुसऱ्या फेरीत धनजंय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय , सातारा या संघास नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अटातटीच्या लढतीत संघास हार मानावी लागली .सदर स्पर्धेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळवून शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय खो -खो स्पर्धेसाठी पाञता मिळविली. या संघात कु. अक्षता खाडे कु.रुपाली सावंत कु. आरती बाबर कु.हर्षदा सांवत कु. नम्रता खाडे.कु. भाग्यश्री लोखंडे कु.कल्याणी बाबर कु. अनुजा ढेकळे कु.आशा तोरणे कु.श्रद्धा गायकवाड कु. चैताली खाडे कु.स्वाती औताडे कु.अंकिता सावंत कु.सानिका चव्हाण या खेळाडूचा समावेश होता. या यशस्वी संघास प्रा. प्रिंयका खांडेकर व प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय खो – खो स्पर्धा दि. २० व २१ आँक्टोंबर २०२२ रोजी एस.जी एम. महाविद्यालय , कराड या ठिकाणी होणार आहेत. या यशस्वी संघाचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ.ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,फ.ए.सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी मा. श्री . अरविंद निकम, अधिक्षक मा.श्री.श्रीकांत फडतरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस.टी. कदम , आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.